श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत

श्री कोटेश्वरी देवी

19/03/2013 22:28
दापोली पासून अवघ्या ८ कि मी अंतरावर दापोली -शिर्दे -कोळबांद्रे या मार्गावर सडवली हे छोटसं टुमदार गाव वसले आहे,जेमतेम ३० ते ३५ घरे असणारं हे रत्नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यातील एकमेव गाव, धनगरवाडी पर्यंत सडवली गावचा एकून विस्तार ,पवार,सावंत, महाडिक, सुर्वे, कदम,खरात, कोकरे, आंब्रे,अशी अनेक आडनावाची लोकं येथे आनंदाने या गावामध्ये वास्तव्य करून आहेत.
 
 श्री कोटेश्वरी देवी हे या गावचे जागृत देवस्थान,गावामध्ये श्री कोटेश्वरी देवीच सुंदर असं ४० एकर जंगलामध्ये नदीच्या काठावरती नव्याने आर सी सी बांधकाम असलेले सुंदर असे शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेले सुरेख मंदिर आहे, जागृत देवस्थान म्हणून या देवीची दापोली मध्ये ओळख आहे, कालकाय देवी, वाघजाई देवी,या दोन देवी मंदिरामध्ये स्थानापन्न आहेत,श्री कोटेश्वरी देवीच्या गाभाऱ्याबाहेर मूर्तिमंत शिपाई २४ तास पहारा देत असतात,मंदिराचा दरवाजा भक्तांसाठी २४ तास उघडा असतो, रात्रीच्या वेळी वाघोबाचे मंदिराभोवती संचलन चालू असते,मंदिरामधील वाघजाई देवीचा घोडा म्हणून या वाघावर संपूर्ण नियंत्रण असते,गावच्या घनदाट जंगलामध्ये राजा सारखा वावरणारा येथील वाघोबा रात्रीचा गावामध्ये सलामी देत असतो,अजून पर्यंत कुणालाही जखमी केल्याचे ऐकीवात नाही,वाघाच्या भीतीने या गावामध्ये चोरी  कधी होतच नाही,नवरात्र व शिमगा हे दोन उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरे होतात,नवरात्रीमध्ये नऊ दिवस ग्रामस्थ मंदिरामध्ये जागरण करतात,याच दिवसामध्ये निसर्ग पूर्ण बहरलेला असतो काकडी,चीबुडाच प्रसाद देवीला दाखविला जातो,हजारो भक्त नवरात्रीमध्ये या गावाकडे कूच करतात,दसऱ्याला सोन लुटण्याचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर चालतो.
 
 शिमगा हा देवीचा सर्वात मोठा उत्सव मुंबईकर ग्रामस्थ या उत्सवासाठी गावाकडे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देवीला रूपे लावून पालखी सजविली जाते ,उत्सवाच्या काही दिवस अगोदर देवी संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये भिक्षुकीसाठी बाहेर पडते,शिमगा सणाच्या पुर्वाधाला तीच  गावच्या वेशीवर म्हणजे सीमेवर दिमाखात आगमन होत, ग्रामस्थ ढोल ताशे घेऊन तीच स्वागत करतात,याच रात्री गावचे मानकरी शंकरराव पवार यांच्याकडे देवीच वास्तव्य असते,जागरणासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा होतात,दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरा समोर असलेल्या होमाच्या ठिकाणी जमून होमाची तयारी करतात,घनदाट जंगलामध्ये मंदिर असल्याने होमासाठी लाकडे जमविणे ग्रामस्थांना सहज शक्य होत, काही कालावधीतच मोठा होम सजविला जातो,संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये सडवली गावचा होम सर्वात मोठा असतो, विधिवत पूजा करून होम पेटविला जातो ,रात्रो बरोबर १२.०० वा होम पेटविला जातो,होळीमध्ये पहिला नारळ टाकण्याचा मान खेल्यांचा असतो नंतर ग्रामस्थ होमाला प्रदक्षिणा  घालून नारळ अर्पण करतात, संपूर्ण  होम पेटत असताना खांदयावर पालखी घेऊन ग्रामस्थ होमाभोवती ५ प्रदिक्षणा घालतात हे एक जिकरीचे आणि जोखमीचे काम गावाकडील ग्रामस्थ निर्भीडपणे पार पाडतात,पालखी नाचावून ग्रामस्थ रात्रभर सानेवरती जागरण करतात,तिसऱ्या दिवशी साना भरण्याचा कार्यक्रम असतो उत्सवामधील देवीचा हा महत्वाचा भाग असतो,दिमाखात सजविलेल्या पालखीसमोर सर्व भक्तगण नतमस्तक होऊन गावचा गावठ्या देवीला गाऱ्हाणे  घालून घरपट १ याप्रमाणे श्रीफळ देवीला अर्पण करून सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतो,याच ठिकाणी नवस फेडले जातात,नवीन नवस केलेही जातात,नवसाला पावणारी देवी अशी ह्या देवीची ओळख आहे,याच उत्सवामध्ये सोन्याचे अलंकार नवस म्हणून देण्याची प्रथा आहे, लाखो रुपयाचे अलंकार देवीला या उत्सवामध्ये मिळतात, प्रसाद देऊन सानेवरील सानाभारण्याचा कार्यक्रम संपवून पालखी रात्रीच्या वेळेला मानकरी यांच्याकडे वस्तीला जाते,रात्रभर पालखी नाचवली जाते , तिसऱ्या दिवशी पालखी घर घेण्याचा कार्यक्रम ला असतो,प्रत्येकाच्या घरी पालखी जाते, देवी जेव्हा घरी येते तेव्हा घरची सुवासिन आरती ओवाळून देवीच स्वागत करते,कितीही दूर गेलेली माहेर वासिन या उत्सवामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी धावून येते,  सर्व ग्रामस्थ पालखी बरोबर असतात, पालखी संध्याकाळी मंदिरामध्ये येते,शिंपणे अर्थात होम भरण्याचा कार्यक्रम आटोपून सडवली  गावच्या शिमगा सणाची सांगता होते,
 
मे महिन्यामध्ये शाळा कॉलेजना सुट्टी पडते, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या प्रमाणात गावाकडे सुट्टी घालविण्यासाठी गावाकडे धाव घेतात,सडवली गावच मे मधील वातावरण थंडगार असते,देवीचा गोंधळ व पोस्ताचा कार्यक्रम याच कालावधीमध्ये आयोजित केला जातो,गोंधळामध्ये गोंधळी गोंधळ घालून लोकांचे मनोरंजन केले करतो ,गोंधळामध्ये नाचून लहान तसेच मोठी माणसे आनंद साजरा करतात,दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे,दापोलीला आल्यावर सडवली या गावाला भेट दिल्यावर तळ कोकणात गेल्याच आनंद घेता येईल ,देवीच्या नावाने मुंबईमध्ये श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळ मुंबई हे मंडळ गावाकडील सर्व उत्सवावर नजर ठेवून असते,गावासाठी हे मंडळ मार्गदर्शनाची भूमिका बजावते,मंडळाने नुकतीच www.koteshavaridevi.webnode.com ही वेबसाईट चालू केली आहे, गावाकडे मंदिराच्या सेवेसाठी श्री देवी कोटेश्वरी मंदिर ट्रस्ट हे कार्यरत असून आपल्याला मंदिरासाठी कोणतेही देणगी दयायची असेल तर श्री देवी कोटेश्वरी मंदिर ट्रस्ट जिर्णोधार (Shree Devi Koteshwari Mandir Trust Jirnodar) या नावे देऊ शकता, कोळबांद्रे  येथील असलेले श्री डिगोबा देवस्थान कोटेश्वरी देवीचा भाऊ लागत असून दर ३ वर्षांनी अक्षय तृतीयाला भावाला भेटण्यासाठी देवी जात होती,आता ग्रामस्थ ३ वर्षांनी मंदिरामध्ये पूजेचे आयोजन करून उत्सव साजरा करतात,मुंबईतला प्रत्येक चाकरमानी उत्सवाला हजर असतो,अशी ही कोटेश्वरी देवी गावची ग्रामदैवत असून गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने तिचे पूजन,स्मरण,करीत असून भक्तांच्या पाठीशी ती  सदैव हजर असते,
 
Contact

श्री किशोर गंगाराम सावंत

kkksawant@rediffmail.com

Thane

9867136377

Search site

माहीती

कै सिताबाई पवार पारितोषक

पारितोषिक

कै सिताबाई पवार स्मरणार्थ१०वी एक उतीर्ण विध्यार्थानसाठी१०००रुचे पारितोषक

मु- सडवली पो-उंबर्ले ता-दापोली,श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत

Make a website for freeWebnode

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत