श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत

मंडळाची माहिती

    श्री कोटेश्वरी मंडलाची स्थापना १९५१ साली मुंबई येथे छोट्या स्वरूपात झाली,

 श्री शंकर भाउराव पवार यानी ह्या मंडलाची मुहतमेढ़ मुंबई येथे रोवली,

१९९९ पासून या मंडळाची सूत्रे तरुण सभासदांच्या हाती आहेत  इवलेसे रोप

 लवियले दारी तयाचा वेल गेला गगनावरी या प्रमाने हे  मंडल खुप मोठी भरारी

 घेऊ पाहत आहे,

     गावच्या विकासासाठी स्थापन झालेले हे मंडल  गावच्या विकासा

कडे जोराने वाटचाल करीत आहे, सडवली गावाच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी मंडळ

 मुंबई येथे २६ जानेवारी, १ मे,१५ ऑगस्ट,दसरा  अशा ४ सर्व साधारण सभेचे

आयोजन करते  मंडळाने आतापर्यंत गावाकडे हनुमान वाडीतील रस्त्याचे मोठे

काम करून एक आदर्श निर्माण केला आहे,त्याच बरोबर गावच्या विकासाबाबत

शासन दरबारी विकास कामांचा पाठपुरावा चालू आहे,ह्यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण,

गावातील नदीवरती पक्का बंधारा,स्ट्रीट लाईट,धनगर वाडीसाठी पक्का रस्ता

 इत्यादी,

     गावच्या  विध्यार्थी वर्गाचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीवरती

 शाबसकीची थाप पडावी म्हणून दरवर्षी १० वी उतीर्ण एका विध्यार्थी वर्गासाठी

कै सीताबाई पवार यांच्या सृम्ती प्रीत्यथ रु १०००/- व प्रशस्तीपत्रक देऊन

गौरण्यात येते ,गावातील सुप्त कलाकार पुढे यावा  त्यांच्या पाठीवरती 

शाबसकीची थाप पडावी म्हणून मंडल दरवर्षी घरगुती गणेश उत्सव स्पर्धा

भरवते यशस्वी कलाकरांनागणेश ट्रॉफी देऊन गौरण्यात येते, मंडळाचा दरवर्षी

 मुंबई येथे कुटुंब मेळावा भरविला जातो अल्पपोहार तसेच महिलांसाठी हळदीकुंकू

आयोजित केला जातो,कोकणचे अनेक शिमगा उत्सव कोर्टाच्या केसेस मध्ये

अडकले असताना आणि सडवलीचा शिमगा सन त्याच वळणावर झोकावे खात

असताना मंडळाने यशस्वी मध्यस्थी करून सडवलीचा शिमगा सन तालावर 

आणण्यास मोलाची भूमिकाबजावली आहे , दरवर्षी शिमगा उत्सवामध्ये

घरोघरी जाणारी ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवी पुन्हा ग्रामस्थांच्या घरोघरी जावू

लागली

   सडवली मध्ये सुंदर असे हनुमान मंदिर दिसते आहे ते उभे करण्यात मंडळाचा

 मोलाचा हात आहे   गावाकडे कोटेश्वरी देवीचा शिमगा  उत्सव दरवर्षी मोठ्या

 प्रमाणात साजरा होतो या उत्सवामध्ये दरवर्षी मंडळाकडून छोटीशी भेट वस्तू

स्वरुपात दिली जाते,उत्सवामध्ये मुंबईकर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी

 होतात,पूर्वजांनी ह्या मंडळाचे नाव श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळ मुंबई असे

अगदी सार्थक स्वरुपात ठेवले आहे,मंडळाचे सभासद,कार्यकर्ते देशात अगर

 परदेशात कुठेही जावोत सडवली करांची ग्रामदैवत असलेली श्री कोटेश्वरी देवी

त्यांच्या पाठीशी नेहमी सादर असते,

   शुभ अगर अशुभ कार्यामध्ये मंडळाचे

 कार्यकर्ते कोणतेही तमा न  बाळगता बेरीज वजाबाकीचा विचार न करता

 हजर असतात, जगाची वाटचाल वेगाने चालू आहे या प्रवाहमध्ये टिकून

 राहायचे असेल तरत्या वेगाबरोबर आपल्यालाही पलन्याची गरज आहे, 

संगणक क्रांतीने जगाला केव्हाच वेढाघातलाय  आपणही मागे पडू नये म्हणून

या वेबचा छोटासा प्रयत्न,दिवसेंदिवस वाढत  जाणारी महागाई,भ्रष्टाचार,

दहशतवाद यांना तोंड देत मंडळाचे सभासद मुंबईमध्ये सभेच्या रुपात

एकत्र येऊन स्वताच्या दुःखाचा भार श्री कोटेश्वरी देवीच्या चरणी अर्पण 

करून देशात,परदेशात,गावाकडे वास्तव्यात असणाऱ्या मंडळाच्या सर्व 

सभासदांना श्री कोटेश्वरी देवीजवळ सुखी ठेवण्याची प्रार्थना करतात

ह्या मंडळाला मदत करणाऱ्यांची यादी देणे येथे शक्य नाही परंतु आजी

 माजी सर्व सभासदांचे मंडळ  सदैव  ऋणी राहील

            आपले

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळ मुंबई

 

 

 

Contact

श्री किशोर गंगाराम सावंत

kkksawant@rediffmail.com

Thane

9867136377

Search site

माहीती

                  

कै सिताबाई पवार पारितोषक

पारितोषिक

कै सिताबाई पवार स्मरणार्थ१०वी एक उतीर्ण विध्यार्थानसाठी१०००रुचे पारितोषक

मु- सडवली पो-उंबर्ले ता-दापोली,श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत

Create a free websiteWebnode

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत